निम्हणांच्या समर्थकांची ‘गिरीं’वर दादागिरी - Marathi News 24taas.com

निम्हणांच्या समर्थकांची ‘गिरीं’वर दादागिरी

 24taas.com, पुणे
पुण्यात आमदार विनायक निम्हणांची आंदोलक अधिका-यांविरोधात दादागिरी सुरू आहे. आधी तहसीलदारास धमकी देणाऱ्या निम्हणांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की केली आहे. आमदार विनायक निम्हण यांच्यावर पुण्यातील तहसिलदार सचिन गिरी यांना शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
 
तहसिलदारास धमकी दिल्यामुळे संतापलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी निषेध म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात कामबंद आंदोलन पुकारल आहे. तर तहसीलदारांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचं निम्हण यांनी म्हटलंय. त्यामुळेच या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात आमदार विनायक निम्हण यांनीही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी निम्हण समर्थकांनी पोलिसांना धक्काबुक्की केली. त्यामुळं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
 
मात्र, आमदार विनायक निम्हण यांनी हे आरोप फेटाळेत. `शासन आपल्या दारी` या उपक्रमातून १५०० अर्ज छाननी होऊन तहसिलदार गिरी यांच्याकडे आले होते. मात्र त्यांनी त्यावर कहीही कार्यवाही केली नाही. कामचुकारपणा करत त्यांनी याबाबत विचारलं असता दुरुत्तरे दिली, असा आरोप आमदार निम्हण यांनी केला. आपल्याकडे अतिरीक्त कारभार आहे, अशा कामांना वेळ नाही, अशी उत्तरे तहसिलदारांनी दिल्याचं निम्हण यांचं म्हणणं आहे.
 

 

First Published: Monday, January 2, 2012, 20:54


comments powered by Disqus