पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी 'एकला चलो रे' - Marathi News 24taas.com

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी 'एकला चलो रे'

www.24taas.com, पिंपरी-चिंचवड
 
अजित पवार पिंपरी-चिंचवड मध्ये आपली ताकद दाखविण्यास सज्ज झाली आहे, कारण की आता पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिका निवडणुका होणार आहेत. त्याच पार्श्वभुमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची ताकद दाखविणार आहे, मागील नगरपरिषदेच्या झालेल्या निवडणूकित राष्ट्रवादीने आपली चुणूक दाखवून दिली आहे. त्यामुळे आता महापालिकेत सुद्धा एकट्याने लढण्याचा विचार राष्ट्रवादीकडून करण्यात येतो आहे.
 
पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज याबाबत स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत. राज्यभरात काँग्रेसशी आघाडीची चर्चा सुरू असताना पिंपरीत मात्र राष्ट्रवादीने पुन्हा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेत काँग्रेसला दूर ठेवण्याचा इरादा स्पष्ट केला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. त्यामुळं पुन्हा एकदा स्वबळावरच लढण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातं आहे.

First Published: Tuesday, January 3, 2012, 18:44


comments powered by Disqus