पुण्यात राष्ट्रवादीचा एकलो चलोचा नारा - Marathi News 24taas.com

पुण्यात राष्ट्रवादीचा एकलो चलोचा नारा


www.24taas.com, पुणे
 
पुण्यात काँग्रेस बरोबर आघाडीची शक्यता नसल्याचं स्पष्ट संकेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेत. पिंपरी-चिंचवडनंतर पुण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.
 
पुण्यात राष्ट्रवादीला स्पष्ट बहूमत हवं असल्यामुळे अजित पवारांनी महापालिका निवडणुकांसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करत योजनांचा खैरात वाटली.
 
पिंपरी चिंचवडचा जाहिरनामा प्रसिद्ध केल्यानंतर अजित पवारांनी पुण्यातही राष्ट्रवादीचा स्वतंत्र जाहिरनामा प्रसिद्ध करत काँग्रेसवर कुरघोडी केलीय. एव्हढच नाही तर पुण्यातही काँग्रेसबरोबर युती होण्याची शक्यता नसल्याचं जाहीर करत राष्ट्रवादी पुण्यातही स्वबळावर लढेल याचे स्पष्ट संकेत दादांनी दिलेत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवरही टीका करण्याची संधी सोडली नाही.
 
यावेळी अजित पवारांनी सुरेश कलमाडी यांच्यावरही जोरदार फटकेबाजी केली.  पुण्याचा विकास करायचा असेल तर स्पष्ट बहुमत असायला हवं. त्यासाठी यापुढे पुण्यात सेना-भाजप आणि काँग्रेसही नको असा नाराही अजितदादांनी यावेळी दिला.
 
एकूणच पिपंरी-चिंचवडपाठोपाठ पुण्याचा गड काबीज करण्यासाठी अजितदादांनी आपल्या रोखठोक शैलीत निवडणुकीची रणशिंग फुंकलय. आता त्यांच्या सुपरफास्ट एक्स्प्रेसला कितपत यश मिळतं हेच पाहणं औत्सुक्याचं ठरणारंय.
 

 

 

First Published: Wednesday, January 4, 2012, 14:32


comments powered by Disqus