Last Updated: Wednesday, January 4, 2012, 14:23
www.24taas.com, पुणे 
निवडणुकिच्या तारखा काल जाहीर झाल्या आणि त्यानंतर संपूर्ण राज्यात आचारसंहिता लागू झाली. पण आचारसंहिता लागू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमीपूजन सोहळा उद्घाटन सोहळा केल्याने त्यांनी आचारसंहिता भंग केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून आचारसंहिता भंग झाल्याचा आरोप भाजपनं केला आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतरही अजित पावरांनी शिवाजीनगरमधील उड्डाण पुलाच्या कामाचे भूमीपूजन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजप अजित पवारांविरोधात निवडणूक आयोगाकडं तक्रार करणार असल्याची माहिती पुण्याचे शहराध्यक्ष विकास मठकरी यांनी दिली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांना आचारसंहिता लागू झाल्याची पूर्ण कल्पना होती. हे त्यांनी केलेल्या भाषणातूनही स्पष्ट होत असल्याचा दावा भाजपनं केला आहे. यासंदर्भातल्या भाषणाच्या आणि भूमीपूजनाच्या कार्यक्रमाची सीडी निवडणूक आयोगाकडं सादर करणार असल्याचंही भाजपतर्फे सांगण्यात आलं आहे.
First Published: Wednesday, January 4, 2012, 14:23