इंदापुरात शेतकरी रस्त्यावर - Marathi News 24taas.com

इंदापुरात शेतकरी रस्त्यावर


www.24taas.com, पुणे
 
शेतक-यांच्या कर्ज माफी योजनेत गैरव्यवहार झाल्याविरोधात इंदापुरात हजारो शेतक-यांनी रस्त्यावर उतरून निषेध केला.
 
या मोर्चाला नगरपालिकेच्या मैदानातून सुरूवात झाली. त्यानंतर इंदापूरमधल्या मुख्य रस्त्यावरून मोर्चा तहसीलदार कार्यालयावर नेण्यात आला. इंदापूर अर्बन बँकेत झालेल्या गैर व्यवहारांची चौकशी करण्यात यावी याबाबतचं निवेदन यावेळी तहसीलदारांना देण्यात आलं.
 
यावेळी शेतक-यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. हा मोर्चा म्हणजे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय. दरम्यान इंदापूर बँकेतील घोटाळ्यांचे आरोप चुकीचे असल्याचं सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलय. याप्रकरणी कुठल्याही चौकशीला सामोरं जाण्याची तयारी असल्याचं त्यांनी म्हटलय.

First Published: Friday, January 6, 2012, 14:56


comments powered by Disqus