Last Updated: Tuesday, October 18, 2011, 06:40
झी 24 तास वेब टीम, सातारा खडकवासला मतदार संघातल्या निकालावरून साताराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजेंनी जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. स्वयंघोषीत टग्यांमुळं पक्षाचा पराभव झाल्याचा टोला उदयनराजेंनी लगावला. हा निकाल म्हणजे हेकट पद्धतीने काम करणा-यांसाठी ट्रेलर आहे असं सांगत याचे आणखी दुष्परिणाम होण्यापुर्वीच पक्षाध्यक्ष शरद पवारांनी लक्ष घालावे अशी मागणीच केली आहे. त्यामुळं एकप्रकारे अजित पवारांना चाप लावण्याची मागणी त्यांनी केली आहे. सत्ता आणि पैशाच्या जोरावर आपण सांगू तेच धोरण नेहमी चालत नाही.

पैशानं सगळं काही विकत घेता येत नाही लोकं मनानं जिंकता येतात असंही उदयनराजेंनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. अजित पवारांच्या कार्यपद्धतीला कंटाळून अनेक जण पक्षातून बाजूला झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. यातुन बोध घेतला नाही तर पक्षाला धोका निर्माण होईल असा इशारा देत त्यांनी शरद पवार यांना लक्ष घालून मार्गदर्शन कऱण्याची विनंती केली आहे. या पत्रामुळे उदयनराजे विरूद्ध अजित पवार पुन्हा रंगण्याची चिन्हे आहेत.
First Published: Tuesday, October 18, 2011, 06:40