Last Updated: Monday, January 9, 2012, 13:04
www.24taas.com, सोलापूर 
सोलापूरमधील लोकमंगल प्रतिष्ठान आणि सोलापूर श्रमिक पत्रकार संघाकडून दिल्या जाणाऱ्या लोकमंगल जीवनगौरव पुरस्कारांचं वितरण आज करण्यात आलं. झी चोवीस तासचे संपादक मंदार परब यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले.
कृषिवलचे संपादक संजय आवटे, दिल्ली लोकसत्ताचे सुनील चावके, ज्येष्ठ पत्रकार शंकर येवले, सोलापूरचे गिरीष मंगरुळे यांना मंदार परब यांच्या हस्ते लोकमंगल पुरस्काराने गौरविण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी गोकुळ मवारे, लोकमंगल प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष देशमुख, झी चोवीस तासचे अँकर अजित चव्हाण उपस्थित होते. पत्रकारांनी समाजासाठी सतत काम करत रहावं, असं आवाहन मंदार परब यांनी केलं...
First Published: Monday, January 9, 2012, 13:04