Last Updated: Monday, January 9, 2012, 09:22
www.24taas.com, कोल्हापूर कोल्हापुरात टोलविरोधी आंदोलनामुळे पूर्ण शहर आणि जिल्ह्यातही बंद पाळण्यात येणारेए. या बंदमध्ये सर्वसामान्यांसह वाहनचालक आणि रिक्षाचालकही सहभागी होणारेत. सकाळी अकरा वाजता महामोर्चा काढण्यात येणार असून आज शहरातील सर्व व्यवहार ठप्प राहणार आहेत. कुठल्याही परिस्थितीत टोल देणार नाही अशी भूमिका कोल्हापूरमधील लोकांनी घेतली असून रस्ते विकास प्रकल्पासाठी लागणारा खर्च राज्य किंवा केंद्र सरकारनं द्यावा अशी मागणी आहे.
आयआरबीनं उभारलेलं सर्व टोल नाके लोकांनी सुरू होण्यापूर्वीच फोडून टाकलेत. टोलला तात्पुरती स्थगिती दिली गेली असली तरी कायमस्वरूपी टोल रद्द व्हावा यासाठीच आज बंद आणि महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे
First Published: Monday, January 9, 2012, 09:22