Last Updated: Monday, January 9, 2012, 13:03
www.24taas.com, पुणे पुणे जिल्हा न्यायालय दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याचा इशारा गुप्तचर खात्याने ( इंटिलिजिन्स ब्युरो) दिला आहे. आयबीच्या अलर्टनंतर जिल्हा न्यायालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
दिल्ली उच्च न्यायालयात झालेल्या बॉम्ब स्फोटानंतर पुणे लक्ष्य असल्याचा इशारा गुप्तचर खात्याने दिला आहे. पुणे पोलिसांनी बार काऊन्सिलला सहकार्य करण्याचे पत्र पाठवले आहे. त्यानंतर पुणे पोलिस आणि बार काऊन्सिल यांच्या या संदर्भात बैठकही झाली.
First Published: Monday, January 9, 2012, 13:03