Last Updated: Wednesday, January 11, 2012, 22:02
www.24taas.com, पुणे 
पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात युती झाली असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. या संदर्भातली अधिकृत घोषणा १४ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे.
मागच्या वेळीस निवडणुक निकालानंतर काँग्रेसला महापालिकेतील सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप एकत्र आले होते. पुणे काँग्रेसचे सर्वेसर्वा सुरेश कलमाडी यांना राजकीय शह देण्यासाठी अजित पवारांनी राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपची यशस्वी मोट बांधली. हा अभूतपूर्व राजकीय प्रयोग राज्यात पुणे पॅटर्न म्हणून प्रसिध्द झाला. या पॅटर्नची पुनरावृत्ती काही ठिकाणी पहायला मिळाली.
First Published: Wednesday, January 11, 2012, 22:02