Last Updated: Thursday, January 12, 2012, 10:27
www.24taas.com, मिरज 
मांडूळ या दुतोंडी सापाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात सांगली पोलिसांना यश आलं आहे. या टोळीतल्या दोन जणांना पकडण्यात आलं असून त्यांच्याकडून १२ लाख रुपये किंमतीची तीन मांडूळं जप्त करण्यात आली आहेत.
खंडेराजुरी या गावात छापा घालून मिरज पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या मांडूळांची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे. शक्तीवर्धक आणि गुप्तधन मिळवण्याच्या अंधेश्रद्धेमुळे या मांडूळांना मोठी मागणी असते. एका मांडूळाची किंमत साडेतीन लाखांपर्यंत असते. या मांडूळांना परदेशात मोठी मागणी असल्यानं त्यांची मोठ्या प्रमाणात तस्करी होते.
अत्यंत दुर्मिळ जातीच्या मांडूळ सापाचीं आतंरराष्ट्रीय बाजारपेठेत यांची किंमत जास्त असल्याने या सांपाचीं तस्करी मोठ्या प्रमाणात केली जाते, त्यामुळे या सापांची जमात नष्ट होण्याचा धोका आहे.
First Published: Thursday, January 12, 2012, 10:27