महाबळेश्वरमध्ये गारठ्याने कामगाराचा मृत्यू - Marathi News 24taas.com

महाबळेश्वरमध्ये गारठ्याने कामगाराचा मृत्यू

www.24taas.com, मुंबई
 
महाबळेश्वरमध्ये कडाक्याच्या थंडीमुळे एका परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. शहरातील वेण्णा लेक ते मेटगुताड परीसरात थंडी जास्त आहे. तिथं सलग तीन दिवस हिमकणांचा सडा पडतोय. या परीसरात राहणाऱ्या सूरज सर्व्हिसींग सेंटरमधील कामगार मेहमूद हबीद शेख हा राहत्या ठिकाणी मृतावस्थेत आढळला.
 
सर्व्हिसींग सेंटरचे मालक राजेंद्र जांभळे हे सेंटर उघडण्यासाठी गेले असता पत्र्याच्या शेडमध्ये मेहमूद मृतावस्थेत आढळला. मेहमूद हा ओरिसा राज्यातील वसमगावचा मूळ रहिवासी आहे. सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासनं तापमान कमालीचं घसरलं आहे.
 
 

First Published: Sunday, January 15, 2012, 16:18


comments powered by Disqus