साईमंदिराच्या पार्किंग लॉटमध्ये चोरी - Marathi News 24taas.com

साईमंदिराच्या पार्किंग लॉटमध्ये चोरी

प्रशांत शर्मा,www.24taa.scom, अहमदनगर
 
शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील व्हीआय़पी पार्किंगमध्ये असलेल्या टोयाटा फॉर्च्युनरच्या गाडी चालकाचं लक्ष विचलीत करुन अज्ञात चोरट्यांनी गाडीतील ८ लाख ४० हजार रोख असलेली बॅग घेऊन पोबारा केला. खरंतर या  परिसरात पोलिसांचा आणि साई संस्थानच्या सुरक्षा रक्षकांचा कडक पहारा असतो पण तरीही अशी घटना घडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे .
 
साईबाबांच्या दर्शनासाठी आलेले व्हीआयपी आपल्या गाड्या नगर-मनमाड रोडवरच्या एक नंबर प्रवेशव्दारासमोर लावतात व्यावसायिक दिपक नारायणी यांचीही गाडी याच ठिकाणी पार्क करण्यात आली होती. दोन अज्ञात तिथे आले आणि ड्रायव्हरसमोर तुमचे पैसे पडले असल्याचा बनाव केला. पैसे पाहण्यासाठी तो खाली वाकला असता, त्या अज्ञातांनी मधल्या सीटवरच्या दोन बॅगा घेऊन पोबारा केला.
 
दिपक नारायणी यांनी पोलिसांकडे चोरीची तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणात ड्रायव्हरसह इतरांची चोकशी सुरू सध्या सुरू आहे. खरंतर साईमंदिर परिसरात जागोजागी पोलीस आणि साई संस्थानचा वेढा असतो,तरिही गाडीतून बॅगांची चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
 

First Published: Monday, January 16, 2012, 08:29


comments powered by Disqus