सातारा पोलिसांची चोख कामगिरी - Marathi News 24taas.com

सातारा पोलिसांची चोख कामगिरी

www.24taas.com, सातारा
 
साता-यात मालमत्तेच्या वादातून अपहरण करण्यात आलेल्या देवेंद्रसिंह परिहार यांची सुटका करण्यात पोलिसांना यश आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुंड राजू केतकरला अटक केली. पाचगणीतल्या मालमत्तेच्या वादातून देवेंद्रसिह परिहार यांचं खंबाटकी घाटातून अपहरण करण्यात आलं होतं.
 
शनिवारी रात्रीच्या सुमारास हे अपहरणनाट्य घडलं. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण जिल्हयात अलर्ट जाहीर केला होता. रविवारी 11 च्या सुमारास गुंड राजू केतकर मलकापूरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक मुरलीधर मुळूक यांनी सापळा रचून राजू केतकरला अटक केली.

First Published: Monday, January 16, 2012, 17:09


comments powered by Disqus