Last Updated: Tuesday, January 17, 2012, 17:57
www.24taas.com, कोल्हापूर 
कोल्हापूर जिल्हा बॅकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मयुर तंबाखू आणि दूध संघाचे अध्यक्ष संजय पाटील याना आज अटक करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून ते फरार होते. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते. तेव्हा आज संजय पाटील स्वतःहून न्यायालयात हजर राहत असताना पोलिसांनी त्याना अटक केली. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅँकेची कोट्यवधी रुपयांची थकबाकी संजय पाटील यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलीय.
First Published: Tuesday, January 17, 2012, 17:57