Last Updated: Sunday, October 23, 2011, 05:18
झी २४ तास वेब टीम, सातारा खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा जिल्हा सहकारी बँकेच्या सीईओंना मारहाण केली. सीईओंनी केलेल्या मारहाणीच्या तक्रारीनंतर शहर पोलिसात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उदयनराजे राष्ट्रवादीचे खासदार आहेत. त्यांनी सातारा जिल्हा सहकारी बँकेच्या सीईओला मारहाण केली. नोकरीची आॅडर काढण्यासाठी बँकेच्या अधिका-यांना दमदाटी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
सातारा जिल्हा सहकारी बँकेचे सीईओ अंकुशराव नलावडे आणि सरव्यवस्थापक डी. एफ. थरु यांना जबरदस्तीनं गाडीत कोंबलं आणि अज्ञात स्थळी नेऊन धमकी दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
First Published: Sunday, October 23, 2011, 05:18