हुतात्मा एक्सप्रेसवर दरोडा - Marathi News 24taas.com

हुतात्मा एक्सप्रेसवर दरोडा

www.24taas.com, सोलापूर
 
सोलापूर-पुणे हुतात्मा एक्सप्रेसवर दरोडा पडलाय. करमाळ्याजवळील केम गावाजवळ ही घटना घडलीय. दरोडेखोरांनी रेल्वेच्या सिग्नलची वायर कापून रेल्वे थांबवली.
 
 
रेल्वे थांबल्याचं पाहून प्रवाशांनी दरवाजे उघडताच सशस्त्र दरोडेखोर बोगीत घुसले. त्यानंतर त्यांनी लूटमार करत प्रवाशांना मारहाण केली. या मारहाणीत दोन प्रवासी जण जखमी झालेत. करमाळ्याजवळ अशा दरोड्याच्या घटना वारंवार घडतात.
 
मात्र पोलीस प्रशासन याची दखल घेत नसल्याचा आरोप प्रवाशांनी केलाय. शिवाय पोलिसांकडे तक्रार देऊनही त्यात काही निष्पन्न होत नसल्यानं या घटनेची तक्रार देण्यास रेल्वे प्रवासी पुढे आले नाहीत.
 

First Published: Friday, January 20, 2012, 10:39


comments powered by Disqus