अजितदादांना तरुणीचा सडेतोड जबाब... - Marathi News 24taas.com

अजितदादांना तरुणीचा सडेतोड जबाब...

www.24taas.com, पिंपरी चिंचवड
 
राजकारणाच्या आखाड्यात उतरण्यासाठी तरूण पिढीही उत्सुक झाली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये निवडणुकीच्या तिकीटासाठी उत्सुक असलेल्या १९ वर्षाच्या तरूणीनं अजित पवारांना सडेतोड उत्तरं देऊन उमेदवारीवर दावा सांगितला.
 
महापालिका निवडणुकांमध्ये वर्चस्व राखण्यासाठी प्रस्थापित राजकीय पक्षांनी जोर लावला आहे. मात्र तरूणांनाही राजकारणाची भूरळ पडू लागली आहे. पालिकेचं सभागृह गाजवण्याची इच्छा असलेल्या दीपालीनं तडख राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी मुलाखत दिली. मात्र तुझं लग्न होऊन तूला दुसरीकडं दिलं तर काय? असा सवाल अजित पवारांनी विचारल्यावर दिपालीनंही तितक्याच हिकमतीनं उत्तर दिलं.
 
अजित पवारांनी विचारलेल्या प्रश्नावर दिपालीने चांगलेच उत्तर दिले. मी पुढील पाच वर्ष लग्नच करणार नाही असं उत्तर देऊन दिपालीने अजित पवारांना सडेतोड जबाबाचा नमुनाच पेश केला. निवडणुकीच्या या रणधुमाळीत आणि इच्छुकांच्या भाऊ गर्दीत दिपालीला तिकीट मिळणार की नाही ? हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र तरूण पिढीही राजकारणाकडे आकर्षित होतेय हे सुलक्षणच म्हणावं लागेल.
 
 
 
 

First Published: Saturday, January 21, 2012, 23:56


comments powered by Disqus