उदयनराजेंचं 'शक्तिप्रदर्शन'! - Marathi News 24taas.com

उदयनराजेंचं 'शक्तिप्रदर्शन'!

www.24taas.com, सातारा
 
साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांचा आणखी एक पैलू सातारातल्या नागरिकांना अनुभवायला मिळाला. शरीरसौष्ठव स्पर्धेला उपस्थित राहिलेल्या उदयनराजेंना स्वतःच पोझ द्यायचा मोह अनावर झाला आणि स्टेजवर राजेंनी दाखवलेली मसल पॉवर बघून प्रेक्षकही आवाक् झाले.
 
दिग्गज शरीरसौष्ठवपटूंबरोबर राजेंनी आपल्या मोकळ्या स्वभावानुसार पोझ दिली. सुहास खामकर आणि अन्य दिग्गज स्टेजवर असताना राजे स्टेजवर गेले आणि त्यांनी आपली ताकद सातारकरांना दाखवली. झेडपी निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना राजेंची पोझ नेमकी कुणाला इशारा होता ? हे कळायला मार्ग नाही. पण राजेंची अशी मसल पॉवर पाहून प्रेक्षकांनी त्यांना उत्स्फुर्त दाद दिली.
 

First Published: Friday, January 27, 2012, 20:34


comments powered by Disqus