महिला पोलिसांचे आबा 'भाऊ' - Marathi News 24taas.com

महिला पोलिसांचे आबा 'भाऊ'

झी २४ तास वेब टीम, सांगली
 
सणांतही ऑनडयुटी असल्यामुळे पोलिसांना खूप क्वचितच सण साजरे करता येतात. त्यामुळे यावर्षी सांगलीतील महिला पोलिसांनी गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या समवेत भाऊबीज साजरी केली.यावेळी महिला पोलिसांनी आर.आर.पाटील यांचे औक्षण करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.
 
यापुढे राज्यातील महिला पोलिसांना राखीबंधन सणादिवशी सुट्टी देण्यात असल्याची घोषणा करुन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी महिला पोलिसांना अनोखी भेट दिली. तसेच पोलीस निरीक्षक पदावरही टप्प्याटप्प्याने महिला पोलिसांना कार्यरत करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
 
सांगलीत गृहमंत्री आर आर पाटील यांनी महिला पोलिसांसोबत भाऊबीज साजरी केली. यावेळी महिला पोलिसांनी आर.आर.पाटील यांचे औक्षण करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. तर आबांनी महिला पोलिसांना ओवाळणीसोबत एक अनोखी भेटही दिली. यापुढे राज्यातल्या महिला पोलिसांना राखीबंधनच्या दिवशी सुट्टी देण्याचा
 
निर्णयही आबांनी जाहीर केला. तसंच पोलीस निरीक्षक पदावरही टप्प्याटप्प्यानं महिला पोलिसांना कार्यरत करण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

First Published: Saturday, October 29, 2011, 11:06


comments powered by Disqus