Last Updated: Sunday, October 30, 2011, 13:19
झी २४ तास वेब टीम, शिर्डीशिर्डीमध्ये साईभक्तांनी मोठी गर्दी केली आहे. दिवाळीची सुट्टी आणि त्याला लागून आलेला शनिवार रविवार यामुळे मोठ्या प्रमाणात साईभक्त शिर्डीत दाखल झालेत. यात गुजरातमधल्या भाविकांची संख्या मोठी आहे. तसंच तेलंगणा आंदोलन शांत झाल्यामुळं आंध्रप्रदेशातल्या भक्तांची संख्याही मोठी आहे. एकाच वेळी भक्तींनी गर्दी केल्यामुळं शिर्डीतली सार्वजनिक व्यवस्था कोलमडून गेलीय. अनेक ठिकाणी ट्राफिक जॅम झालं. व्यावसायिकांची मात्र या गर्दीमुळं चांगलीच दिवाळी सुरू आहे.
First Published: Sunday, October 30, 2011, 13:19