Last Updated: Sunday, October 30, 2011, 10:16
झी २४ तास वेब टीम, सांगली सांगलीत उस दर निश्चिती संदर्भात शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांच्यात महत्वपूर्ण बैठक झाली. राज्य मंत्रिमंडळाच्या तीन नोव्हेंबर पर्यंतच्या बैठकीपर्यंत सांगलीतील सर्व साखर कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. उसदराबाबत शेतकरी संघटनेने उग्र आंदोलन सुरु केलं आहे त्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा प्रशासनाने शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांच्यात महत्वपूर्ण बैठकी बोलावली.
उसाला पहिला हप्ता २२०० रुपये भाव मिळावा या मागणीसाठी संघटनेने आंदोलन सुरु केलं आहे. उसाच्या गाड्या अडविणे, टायर फोडणे यामुळे साखर कारखान्यांना फटका बसत आहे त्या पार्श्वभूमीर ही बैठक सांगलीचे जिल्हाधिकारी श्याम वर्धने यांनी बोलावली. या बैठकीत साखर कारखाने बंद ठेवण्याबरोबर आणि आंदोलन स्थगितीचाही निर्णय घेण्यात आला. या बैठकीला शेतकरी संघटनेचे रघुनाथ आणि सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे मोहन कदम उपस्थित होते
First Published: Sunday, October 30, 2011, 10:16