सरपंच किडनॅप ! - Marathi News 24taas.com

सरपंच किडनॅप !

झी २४ तास वेब टीम, पुणे
लवासा सिटीतील दासवे गावचे सरपंच शंकर धेंडले यांचं अपहरण करून चोरट्यांनी ४७ लाख रुपये लुटल्याची घटना घडली आहे. कोथरुडमधील धायरी भागात राहणाऱ्या धेंडले यांचं 3 बाईक्सवरून आलेल्या पाच चोरट्यांनी अपहरण केलं त्यानंतर त्यांना दूरवर नेऊन मारहाण करण्यात आली. तुमच्याकडे खूप पैसे आहेत आणि आम्हाला ते हवे आहेत असा दम धेंडले यांना देण्यात आला. आम्ही शरद मोहळ टोळीचे असल्याचंही या चोरट्यांनी सांगितलं आणि त्यांच्या घरी जाऊन ४७ लाख रुपये लुटले. पैशांसोबतच तब्बल आठ कोटींच्या दागिन्यांची बॅगही त्यांच्या घरी सापडली आहे.पण पोलीस त्याविषयी काही स्पष्ट सांगायला तयार नाहीत.
 
या सगळ्या प्रकारात अनेक प्रश्न उपस्थित होतात. एका गावच्या सरपंचाच्या घरी इतकी रोख रक्कम कशी, साधारण ८ कोटींचे दागिने त्यांच्याकडे आहेत का आणि असल्यास कसे? पोलीस त्याबाबत उत्तर का देत नाहीत? यासोबतच शरद मोहळ टोळीचा या चोरीतला सहभाग आणि सरपंच आणि शरद मोहळ टोळीचा एकमेकांशी काही संबंध आहे का?  अशा अनेक पैलूंची पोलिसांना कसून चौकशी करावी लागेल.

First Published: Tuesday, November 1, 2011, 13:00


comments powered by Disqus