शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण ! - Marathi News 24taas.com

शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण !

झी २४ तास वेब टीम, सांगली
ऊस तोडणी बंद करण्यासाठी गेलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पाच कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केल्याची घटना सांगली जिल्ह्यात वाळव्यात घडली आहे. 'हुतात्मा' साखर कारखान्याच्या काही जणांनी ही मारहाण केल्याचा आरोप शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. याप्रकरणी आष्टा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. ऊसदरासाठी सांगली जिल्ह्यात शेतक-यांचं आंदोलन सुरु आहे. सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात काल झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळाच्या बैठकीपर्यंत साखर कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसचं शेतकरी संघटनेचं आंदोलनही स्थगित राहिल, असं जाहीर करण्यात आलं होतं. मात्र तरीही वाळवा गावात आज ऊसतोडणी सुरु होती. ही तोडणी बंद करण्यासाठी गेलेल्या स्वाभिंमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना लाठ्या काठ्यांनी मारहाण करण्यात आली. कारखान्याच्या संचालकांनी ही मारहाण केल्याचा आरोप जखमींनी केलाय.

First Published: Tuesday, November 1, 2011, 12:54


comments powered by Disqus