Last Updated: Saturday, November 5, 2011, 13:23
झी २४ तास वेब टीम, अहमदनगर 
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांचा मुलगा जितेंद्र पिचड यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. जितेंद्र यांना घराच्या बाथरूममधे सोमवारी दुपारी चार वाजता घरातल्या बाथरूममधे विजेचा धक्का बसला.
त्यानंतर त्यांना अहमदनगर जिह्यातल्या अकोले इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांची प्रकृती अधिक खालावल्यानं त्यांना संगमनेर इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तिथं डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. जितेंद्र पिचड यांच्या मृत्यूमुळं शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची आज होणार बैठक रद्द करण्यात आली आहे.
First Published: Saturday, November 5, 2011, 13:23