'लवासा'विरोधात खटला दाखल होणार - Marathi News 24taas.com

'लवासा'विरोधात खटला दाखल होणार

झी २४ तास वेब टीम, पुणे
 
लवासावर कारवाईबाबत चालढकल करणा-या राज्य सरकारला आता लवासावर कारवाई करणं भाग पडलंय. लवासाने पर्यावरण संरक्षण कायद्यातील तरतुदींचा भंग करून लवासा सिटीत बांधकाम केल्याने लवासाच्या विरोधात राज्य सरकार खटला दाखल करणार आहे.
 
पुण्याच्या न्यायालयात याबाबत सरकार लवासाविरोधात खटला दाखल कऱणारेय. मुंबई हायकोर्टानं याबाबत राज्य सरकारला कारवाईबाबत विचारणा केलीय. दरम्यान, पर्यावरण नियमांचं उल्लंघन केल्यानं लवासावर कारवाई करण्यासाठी राज्य सरकारनं काल बैठक बोलावली होती.  मात्र, या प्रकल्पासाठी कोणत्याच परवानगीची गरज नसल्याचं प्रमाणपत्र २००५मध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळानंच दिल्यानं आता कारवाई करायची कशी, अशा कोंडीत राज्य सरकार सापडलं होतं.
 
गेल्या नोव्हेबरमध्ये केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने लवासाचं काम थांबविण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतर केंद्राकडून कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता लवासा कार्पोरेशनने पुन्हा काम सुरू केलं होतं.  दरम्यान, मुंबई हायकोर्टाच्या या निर्णयामुळं राज्य सरकारला चपराक असल्याचं समजलं जातंय.

First Published: Thursday, November 3, 2011, 02:56


comments powered by Disqus