सांगली मनसे उपाध्यक्षाने केले अपहरण - Marathi News 24taas.com

सांगली मनसे उपाध्यक्षाने केले अपहरण

झी २४ तास वेब टीम, सांगली
 
पैशाचा व्यवहारातून एका वृद्धाला मारहाण केल्या प्रकरणी सांगली शहराचा मनसे उपाध्यक्ष दर्शन पाठक याला अटक करण्यात आली. पैशाच्या व्यवहाराच्या वादातून या मनसे उपाध्यक्षाने विलास पवार या वृद्धाचे अपहरण केले आणि त्यांना एका खोलीत कोंडून जबर मारहाण केली. दर्शन पाठकचे वडील अभय पाठक चित्रपटाचे निर्माते आणि बिल्डर म्हणून काम करतात.
 
काही दिवसांपूर्वी ठाण्याचे रहिवासी विलास पवार यांच्यासोबत पाठक यांचा जमिनीचा व्यवहार झाला होता. मात्र काही कारणास्तव हा व्यवहार रद्द झाला. या व्यवहारापोटी विलास पवार यांनी पाठक यांना चाळीस चाळीस लाखाचे दोन चेक दिले होते मात्र व्यवहार रद्द झाल्यानंतरही पाठक यांनी पवार यांना चेक परत केले नाही उलट ते चेंक बँकेत क्लिअरिंग साठी टाकून पवार यांच्या विरोधातच चेंक बाऊन्स केल्याची तक्रार केली. या बाबत पवार यांनी सांगलीत जाऊन पाठक पिता पुत्रांना जाब विचारण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांना जबर मारहाण करण्यात आली.
 
दर्शन पाठक य़ांनी पवारांचे त्यांच्या गाडीतून अपहरण केले आणि एका बंद खोलीत कोंडून त्यांना मारहण केली या प्रकरणी दर्शन पाठक, अभय पाठक, सागर पाठक आणि संतोष पाठक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

First Published: Thursday, November 3, 2011, 10:13


comments powered by Disqus