मि. क्लिनवर भूखंड आरक्षणाचे शिंतोडे - Marathi News 24taas.com

मि. क्लिनवर भूखंड आरक्षणाचे शिंतोडे

झी २४ तास वेब टीम, पूणे 
 
बिल्डरचा हितासाठी झटणारे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण मंत्रीपदावरून जाऊन काही महिने होत नाही तोच मि. क्लिन म्हटले जाणारे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात भूखंड आरक्षण देण्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे
 

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात लोकायुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. बिल्डरच्या हितासाठी भूखंडाचं आरक्षण बदलल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांवर करण्यात आला आहे. पुण्यातले नगरसेवक उज्वल केसकर यांनी ही तक्रार दाखल केलेली आहे. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याचीही मागणी करण्यात आली.
 
मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या नगरविकास खात्यानं पुण्यातील  सूस गावातल्या 130 एकर भूखंडांचं आरक्षण बदलून ती रेसीडेन्शीयल झोनमध्ये आणली आहेत. आरक्षण बदलण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांनीच अंतिम निर्णय घेतल्याचं तक्रारदाराचं म्हणणं आहे. पर्ल स्ट्रक्चर प्रायव्हेट लिमीटेड या बिल्डरला याचा फायदा होणार असल्याचा आरोप तक्रारकर्त्यानं केला. मुख्यमंत्र्यांसह नगरविकास खात्याचे मुख्य सचिव आणि टाऊन प्लॅनिंग संचालकांनाही तक्रारीत प्रतिवादी करण्यात आलं आहे.

First Published: Thursday, November 3, 2011, 13:23


comments powered by Disqus