Last Updated: Friday, November 4, 2011, 10:38
झी 24 तास वेब टीम, सांगली 
- वनमंत्री पतंगराव कदम
शिक्षण संस्थेमध्ये भरीव काम करणारे पतंगराव कदम यांनी शिक्षण खात्याच्या कारभाराला वैतागून, काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. 'शिक्षण खात्याचा कारभार दिशाहीन असून शिक्षण खाते एकतर बंद करा, नाहीतर कोणाला तरी चालवायला द्या'. अशी गंभीर टीका वनमंत्री पतंगराव कदम यांनी शिक्षण मंत्र्यांवर केली आहे. शिक्षणमंत्री खातं काँग्रेसकडे आहे.
आपल्याच पक्षातील मंत्र्यांवर टीका करून पंतगरावांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. सांगली जिल्ह्यातील कडेगावात मुख्याध्यापक महासंघाच्या राज्य अधिवेशनातच ते बोलत होते. विना अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांना पगार नाहीत. शिवाय नोकरीसाठी त्यांना पैसे द्यावे लागतात. मी शिक्षणखात्याविषयी बोलेन म्हणूनच शिक्षणमंत्री विजय दर्डा मंत्री मंडळाच्या बैठकीला आले नाहीत अशी टीकाही वनमंत्र्यांनी यावेळी केली.
First Published: Friday, November 4, 2011, 10:38