Last Updated: Monday, February 20, 2012, 23:02
www.24taas.com, सोलापूर सोलापूर जिल्ह्यात भाळवणीत सागर फायर वर्क्स या फटक्यांच्या कारखान्यात स्फोट झालाय. या स्फोटात 30 जणांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येतेय. यामधील 4 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, 11 जण गंभीर जखमी झाले आहेत.
या जखमींना सोलापुरातल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलय. हा स्फोट इतका भयंकर होता की, या परिसरातल्या सुमारे एक किलोमीटर परिसरातल्या घरांना तडे गेले आहेत.. तर सुमारे 5 किलोमीटर अंतरावर या स्फोटाचा आवाज ऐकू आला.
उन्हात ठेवलेल्या फटाके फुटल्याने कारखान्यात आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय.
First Published: Monday, February 20, 2012, 23:02