Last Updated: Saturday, November 5, 2011, 07:44
झी २४ तास वेब टीम, कोल्हापूर 
कोल्हापूर मध्ये ऊसाच्या दरवाढीसाठी आंदोलन केले जात आहे आंदोलनला दडपण्यासाठी कोल्हापूर मध्ये जमाव बंदी लागू केली आहे. ऊसाची दरवाढ हो प्रश्न गंभीर बनू नये म्हणून ही जमाबबंदी लागू करण्यात आली आहे.
कोल्हापूर अशांत जिल्हा घोषित करण्यात आला आहे. 31 डिसेंबरपर्य़त जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यात ऊस दरवाढीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. या काळात जिल्ह्यात मोर्चे आणि आंदोलनं करण्यास मनाई करण्यात आलं आहे. राजू शेट्टी यांच्य़ा क्लेश यात्रेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी हा निर्णय घेतला.
First Published: Saturday, November 5, 2011, 07:44