Last Updated: Thursday, February 23, 2012, 08:46
www.24taas.com, सांगली 
सांगली बाजारपेठेत बेदाण्याच्या हमीभाववरून शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली. त्यामुळे पाच व्यापाऱ्यांना मारही खावा लागला आहे. त्यामुळे बाजारपेठेमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
बेदाण्याचे दर पाडल्याचा आरोप करत सांगलीत शेतकऱ्यांनी पाच व्यापाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली. तसंच बेदाण्याचे सौदे बंद पाडून मार्केट यार्डची तोडफोड केली. व्यापाऱ्यांनी किलोला नव्वद ते एकशे वीस रुपये दर जाहीर केला. शेतकऱ्यांनी मात्र किलोला एकशे एकाव्वन दर देण्याची मागणी केली.
त्यातून वाद झाल्यानं शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना मारहाण करत बेदाण्याचे सौदे बंद पाडले. बेदाण्याला दर मिळत नाही तो पर्यंत सौदे सुरु करणार नसल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. व्यापारी मुद्दाम भाव पाडतात याचा संताप व्यक्त करीत शेतकऱ्यांनी मारहाण केली.
First Published: Thursday, February 23, 2012, 08:46