Last Updated: Friday, February 24, 2012, 21:14
www.24taas.com, पुणे पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर दुसरं तिसरं कोणी नव्हे तर खुद्द उपमुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पुण्यात पालिका निवडणुकीनंतर गुंडगिरी वाढली होती. या गुंडगिरीने पुण्याचे नाव बदनाम झाले. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्णाण झाला आहे.
पूर्ण मोकळीक देऊनही गुन्हेगारी कारवायांवर जरब का नाही असा संतप्त सवाल उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थित केलाय. गेल्या काही दिवसांत पुण्यात गुन्हेगारीच्या अनेक घटना उघड झाल्यात. या पार्श्वभूमीवर पवारांनी पोलीसांचा समाचार घेतला आहे. मात्र, राष्ट्रवादीकडे गृहखातं असल्याने पवारांनी असं का बोलावं, यामागचं कोड काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान, ज्याच्या हद्दीत गुन्हेगारी वाढली असेल त्या अधिकाऱ्याला बदला जाईल, असा इशाही अजित पवार यांनी दिला आहे. त्यामुळे पोलीस दलात चलबिचल सुरू झाली आहे.
पुण्यात निवडणुकीच्या वादातून गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळं पाषणा सुतारवाडी परिसरात तणावाचं वातावरण पसरलं आहे. या परिसरात राष्ट्रवादीच्या उमेदवार रोहिणी चिमटे यांचा विजय झाल्यानं नैराश्यातून राष्ट्रवादीच्याच दुसऱ्या गटाकडून चिमटेंच्या घरावर तुफान दगडफेक करण्यात आली आहे. यात ३० ते ४० गाड्यांचं नुकसान झालं असून त्याचा सामान्य नागरिकांना फटका बसला. यामुळे पालकमंत्री पवार यांच्यावर टीका होत होती.
संबंधित आणखी बातम्या
पुण्यात जिल्हा कोर्टाबाहेर गोळीबारमाजी गृहराज्य मंत्र्यांचा मुलाला अटकराष्ट्रवादीचा राडा, दगडफेक आपल्याच नगरसेवकावरअविनाश बागवेंना पोलिसांची धक्काबुक्की
First Published: Friday, February 24, 2012, 21:14