अजित पवारांच्या हस्ते पंढरपूरच्या विठुरायाची सपत्निक पूजा - Marathi News 24taas.com

अजित पवारांच्या हस्ते पंढरपूरच्या विठुरायाची सपत्निक पूजा

झी २४ तास वेब टीम, पंढरपूर
 
कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते पंढरपूरच्या विठुरायाची सपत्निक पूजा करण्यात आली. राज्यातल्या जनतेला सुखी समाधानी ठेव, आणि राज्यातल्या लोकांचे प्रश्न सोडवण्याची शक्ती दे, असं साकडं यावेळी अजित पवारांनी विठुरायाला घातलं.
 
शासकीय महापुजा एका तासात आटोपण्याचा आदेश खुद्द उपमुख्यमंत्र्यांनी दिला होता. त्यामुळं वारक-यांना दरवर्षीप्रमाणे ताटकळत बसावं लागलं नाही. तर यावर्षी पुजेचा मान बीड जिल्ह्यातल्या वडगावगुंड इथल्या पांडुरंग मुंडे आणि मुक्ताबाई मुंडे या पती-पत्नीला मिळाला. हे पती-पत्नी गेल्या ४० वर्षांपासून पंढरपुरची वारी करताहेत.

First Published: Sunday, November 6, 2011, 08:17


comments powered by Disqus