Last Updated: Friday, February 24, 2012, 22:48
www.24taas.com, पुणे पुण्यात बिबट्याची कातडी जप्त करण्यात आलं आहे. पुणे पोलिसांच्या दरोडा प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केली. या प्रकरणी काशिनाथ कोलाटे आणि रविंद्र पाटील या दोघांना अटक करण्यात आलीय. हे दोघे बिबट्याची कातडी घेऊन कोल्हापूरहून पुण्याला येत होते. याची पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांना सापळा रचला आणि कात्रज घाटातल्या एका ढाब्यावर या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून बिबट्याची कातडी आणि पल्सर बाईक जप्त करण्यात आली आहे. या बिबट्याच्या कातडीची बाजारातली किंमत सात लाखांपर्यंत आहे.
First Published: Friday, February 24, 2012, 22:48