Last Updated: Saturday, February 25, 2012, 16:13
www.24taas.com, पुणे 
पुण्यात धाडसी एन्ड्युरा स्पर्धेचं उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. या स्पर्धेत धाडसी क्रिडा स्पर्धांचा समावेश कऱण्यात आला आहे.
एन्ड्युरा स्पर्धेचं यंदाच हे दहावं वर्ष आहे. या स्पर्धेला सर्व वयोगटातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला होता. जगभरातून स्पर्धक या स्पर्धेसाठी आले आहेत. जवळजवळ ७०० हून अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. शिवाजीनगर पोलीस ग्राऊंडवरुन सुरू झालेली ही स्पर्धा, सिंहगड, राजगड करुन पानशेत धरणाच्या ठिकाणी संपणार आहे.
यावेळी राज ठाकरे यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचं स्वागत केलं आणि त्यांना शुभेच्छाही दिल्या. राज ठाकरे यांच्या उपस्थितीमुळे स्पर्धकांचा उत्साह देखील दांडगा होता. त्यामुळे या स्पर्धेला नवचैत्यनच प्राप्त झालं होतं. तसचं राज ठाकरे यांनी कोणत्याही राजकीय गोष्टीचं विश्लेषण पत्रकारांसमोर केलं नाही, किंबहुना ते बोलणं देखील टाळलचं.
First Published: Saturday, February 25, 2012, 16:13