मुंबईचा दूध, भाजीपाला रोखणार - पाटील - Marathi News 24taas.com

मुंबईचा दूध, भाजीपाला रोखणार - पाटील

झी २४ तास वेब टीम, सांगली
 
मुंबईलाचा दूध आणि भाजीपाला पुरवठा रोखला जाणार आहे. उसाला चांगला दर मिळाला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी दिला आहे.
 
मुंबईला करण्यात येणारा दूध आणि भाजीपाला पुरवठा रोखण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे नेते पाटील यांनी सांगली येथे दिला आहे. त्यामुळे ऊस शेतकरी आंदोलन आता अधिक चिघळले आहे.
 
दरम्यान, कोल्हापूर, सांगली, साता-यानंतर आता पुणे जिल्ह्यातही ऊसदरवाढीचं आंदोलन पेटलंय. बारामती इथल्या माळेगाव साखर कारखान्यावर ऊस उत्पादकांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय होतं. कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब तावरे यांच्या गाडीसह ऊस वाहतूक करणा-या गाड्यांचीही तोडफोड करण्यात आली होती.

First Published: Monday, November 7, 2011, 08:21


comments powered by Disqus