देशव्यापी संपामुळे शाळाही बंद ! - Marathi News 24taas.com

देशव्यापी संपामुळे शाळाही बंद !

www.24taas.com, पुणे
 

देशव्यापी संपाचा पुण्यातील शाळांवर विपरीत परिणाम झाला आहे. पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेतच पाठवलं नसल्यानं बहुतांश शाळा बंद आहेत.
 
विद्यार्थ्यांनी शाळेला सुट्टी मारल्यानं सकाळी शाळा भरल्याच नाहीत. जी मुलं शाळेत गेली. कमी उपस्थितीमुळं शाळा प्रशासनानं मुलांना शाळेततून घरी पाठवलं. संपाच्या दिवशी पालकांनी आपल्या जबाबदारीवर मुलांना शाळेत पाठवावं अशा सुचना शाळांनी आणि रिक्षाचालकांनी केल्या होत्या. त्यामुळं बहुतांश पालकांनी मुलांना शाळेतच पाठवलं नाही.
 
सकाळच्या वेळी भरणाऱ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती नगण्य अशी होती. त्यामुळं शाळा व्यवस्थापनांनी आलेल्या काही मुलांना परत घरी पाठवलं.

 
 
 

First Published: Tuesday, February 28, 2012, 10:14


comments powered by Disqus