शिवसेनेला काकोडकरांचा ठेंगा - Marathi News 24taas.com

शिवसेनेला काकोडकरांचा ठेंगा

www.24taas.com, पुणे
 
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पावर बोलू नका या शिवसेनेच्या धमकीला ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांनी केराची टोपली दाखवली आहे. काकोडकरांनी पुण्यात आयोजित केलेल्या व्याख्यानात अणुऊर्जेच्या गरजेवर बोलताना जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या विषयावरही भाष्य केलं.
 
काकोडकर यांचं पुण्यातल्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये व्याख्यान होतं. यावेळी त्यांनी अणुऊर्जेची गरज विषद केली. यावेळी त्यांनी जैतापूर प्रकल्पावर सविस्तर भाष्य केलं. जैतापूरवर भाष्य करुन त्यांनी एकप्रकारे शिवसेनेच्या धमकीलाच केराची टोपली दाखवली आहे.
 
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पावर जाहीर बोलू नका असा धमकीवजा इशारा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांना शिवसेनेनं दिला होता. शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर काकोडकरांनी जैतापूर विषयावर बोलणं टाळलं नाही त्यामुळे आता शिवसेना नक्की काय भुमिका घेणार?

First Published: Tuesday, February 28, 2012, 13:36


comments powered by Disqus