कोल्हापूर : मुलीच्या अपहरणाचा शोध नाही - Marathi News 24taas.com

कोल्हापूर : मुलीच्या अपहरणाचा शोध नाही

www.24taas.com, कोल्हापूर
 
कोल्हापुरातल्या हातकणंगले तालुक्यातल्या कोरोचीमधून एका दोन वर्षाच्या मुलीचं अपहरण होऊनही अद्याप शोध लागलेला नाही. विशेष म्हणजे अपहरण कुणी केलं हे माहीत असूनही पोलीस हतबल असल्याचे दिसून येत आहे.
 
 
कोल्हापुरातल्या हातकणंगलेमधल्या कोरोची गावातून विवेक पांडेंच्या या दोन वर्षांच्या चिमुरडीचं वीस दिवसांपूर्वी अपहरण झालंय. विवेक पांडेंच्या घरातच राहणा-या अरविंद आणि सुषमा खोत यांनी खाऊ देतो असं सांगून नंदिनीच्या आईकडूनच तिचं अपहरण केलं. पोलिसांकडे तक्रार नोंदवूनही तपासाबाबत गंभीर नसल्याचा आरोप पांडेंनी केला आहे.
 
 
नंदिनीचा तपास लागत नसल्यामुळे महिला आणि सर्वपक्षीय संघटनांनी आता पुढाकार घेतलाय. चार दिवसांत मुलीचा शोध लागला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनांनी दिलाय. तर पोलिसांनी प्रयत्न सुरू असल्याचं नेहमीचं पठडीतलं उत्तर दिलं आहे. वीस दिवसांपासून अपह्रत असणा-या नंदिनीचा शोध लावण्याचं आता पोलिसांसमोर खरं आव्हान आहे.

First Published: Tuesday, February 28, 2012, 15:38


comments powered by Disqus