Last Updated: Thursday, March 1, 2012, 13:01
www.24taas.com, नाशिक नाशिकमध्ये वाहनं जाळपोळीच्या घटनांनी धुडगूस घातला असतानाच नागरिकांना आता चोरट्यांनीही हैराण केलं आहे. वाढत्या चोऱ्याची नागरिकांनी धास्ती घेतली आहे.
नाशकातील महात्मानगर परिसरात एका चोरट्यानं दिवसाढवळ्या सोनसाखळी चोरण्याचा प्रय़त्न केला. मात्र, तिथं असलेल्या नागरिकांनी या चोरट्याला पकडून चांगलाच चोप दिला. या चोराला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तर नाना सोनवणे असं या भामट्याचं नाव आहे. सातपूर गंगापूर भागातही चोरीच्या दोन घटना घडल्या आहेत.
काटेगल्ली परिसरात चोरट्याचा चोरीचा प्रय़त्न फसला. गेल्या दोन-अडीच वर्षात ७००हून अधिक चोरीच्या गुन्ह्यांची नोंद झालीये. मात्र, यातल्या २००गुन्ह्यांची उकल करण्यासही पोलिसांना यश आलेलं नाही. एकूणच चोरट्यांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. पोलीस मात्र गुन्हेगारांना शोधण्यासाठी आता विशेष मोहीम हाती घेतल्याचं सांगत आहेत. मात्र, चोरीत वाढ होत असल्याने नागरिकांनी धास्ती घेतली आहे. या चोरीप्रकरणी पोलीसच जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
First Published: Thursday, March 1, 2012, 13:01