अनैतिक संबंधामुळे केली दोघांची हत्या - Marathi News 24taas.com

अनैतिक संबंधामुळे केली दोघांची हत्या

www.24taas.com, सोलापूर
 
सोलापूरमध्ये अज्ञात मारेकऱ्यांनी तीनजणांवर हल्ला केला आहे. मध्यरात्री केलेल्या या हल्ल्यात दोनजण ठार झाले आहेत. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. दक्षिण सोलापूरातल्या शंकरनगर परिसरात ही घटना घडली आहे. मंद्रुप पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
 
सोलापूरमध्ये अज्ञात मारेकऱ्यांनी तीन जणांवर हल्ला केला आहे. मध्यरात्री केलेल्या या हल्ल्यात दोन जण ठार झाले. त्यात एक महिलाही गंभीर जखमी झाली आहे. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे.
 
दक्षिण सोलापुरातल्या शंकरनगर परिसरात ही घटना घडली आहे. मृत हनमंत राठोड आणि बदामी भोसले यांच्यात अनैतिक संबंध होते. हे दोघेही पोलिसांनाच खबरी देत असल्याच्या संशयावरुन ही हत्या झाल्याचं सांगण्यात येतं आहे. या हत्येविरोधात मंद्रुप पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पण अजून कोणालाही अटक करण्यात पोलिसांना अटक करण्यात यश आलेलं नाही.
 
 
 
 

First Published: Thursday, March 1, 2012, 14:50


comments powered by Disqus