Last Updated: Wednesday, November 9, 2011, 05:48
झी २४ तास वेब टीम, सोलापूरसोलापूरमधल्या पंढरपूर इथं शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी मारुती जाधव या कार्यकर्त्याला ही मारहाण केली. मारुती कारखान्याला ऊस वाहतूक करणा-या ट्रॅक्टरच्या टायरची हवा सोडत असताना त्याला या कर्मचा-यांनी पकडलं आणि मारहाण केली. याप्रकरणी पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
First Published: Wednesday, November 9, 2011, 05:48