Last Updated: Sunday, March 4, 2012, 22:09
www.24taas.com, पुणे 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मोठ्या भावाप्रमाणे आहेत. त्यांच्याबरोबर जैतापूरच्या मुद्यावर बोलेन, असं केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेचा जैतापूर प्रकल्पाला असणारा विरोध हा राजकीय असल्याची टीकाही त्यांनी पुण्यात केली आहे. शेतकऱ्यांनी जैतापूर प्रकल्पासाठी त्यांच्या जमिनी दिलेल्या आहेत. मात्र तरीही त्यांना भडकवण्याचं काम सुरू असल्याचं सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितलं.
त्यामुळे आता सुशीलकुमार शिंदे याच्यांसारखे दिग्गज नेते जर बाळासाहेबांची मनधरणी करणार असतील तर ते बाळासाहेबाचं मन वळवून जैतापूर प्रकल्प करण्यास परवानगी देतील का? किंवा आता यामागे आणखी काही राजकारण आहे हे देखील पाहण ं औत्सुक्याचं ठरणार आहे.
First Published: Sunday, March 4, 2012, 22:09