किरणोत्सव देवीच्या दारी... - Marathi News 24taas.com

किरणोत्सव देवीच्या दारी...

झी २४ तास वेब टीम, कोल्हापूर
 
कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिरात दरवर्षी होणाऱ्या किरणोत्सव ही कोल्हापूरवासियांना एक पर्वणीच असते. या सूर्यकिरणांनी देवीचा गाभारा पूर्णपणे सोनेरी रूपाने जणू काही न्हाऊन निघते. पण त्यामुळे जणू सूर्यदेवताच  गाभाऱ्यात उतरल्याचा भास होतो. देवीच्या संपूर्ण मूर्तीवर हे सूर्यकिरण पडताच संपूर्ण मूर्ती ही सोन्याने मढविल्याचा भास होतो.
 
कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरातील किरणोत्सव सोहळ्याला आज सुरुवात झाली. महालक्ष्मी मंदिरातील किरणोत्सवाचा अदभूत नजारा आज पहायला मिळाला. आज सूर्यकिरणांनी देवीच्या चरणांना स्पर्श केला. महालक्ष्मीच्या मंदिरात तीन दिवस हा किरणोत्सव साजरा होतो. पहिल्यादिवशी देवीच्या चरणांवर येतात. दुसऱ्यादिवशी देवीच्या कमरेपर्यंत आणि तिसऱ्यादिवशी देवीच्या मुखावर सूर्यकिरणं येतात. दरवर्षी ९,१०, आणि ११ नोव्हेंबरला हा किरणोत्सव सोहळा साजरा होतो. आणि हा सोहळा पहाण्यासाठी भाविक प्रचंड गर्दी करतात.
 

First Published: Wednesday, November 9, 2011, 16:58


comments powered by Disqus