पुण्यात दरोडेखोरांची टोळी गजाआड - Marathi News 24taas.com

पुण्यात दरोडेखोरांची टोळी गजाआड

www.24taas.com, पुणे
 
 
पुण्यात एका दुकानावर दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पोलिसांनी अटक केली. या टोळी पाच जणांचा समावेश आहे. त्यांच्याकडून काही शस्त्रात्र जप्त करण्यात आली आहेत.
 
 
मंगेश कांचन, दौलत पर्गे, सतीश कुराडे, सचिन मदने, संदीप घोडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. पोलिसांच्या खंडणी विरोधी शाखेनं ही कारवाई केली. हिंजवडी परिसरात एक महाविद्यालयीन तरुणीचे दागिने काढून घेतल्यासह लुटमारीचे अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. आरोपींकडून दोन पिस्तूल, ८ काडतुसं तसंच एक सॅन्ट्रो कार जप्त करण्यात आली.
 
 
पुणे शहरात दिवसागणिक चोरी आणि दरोडे टाकण्याच्या घटना घडत असल्याने पुणे आणि शहर परिसरात भीतीचे वातापण पसरले आहे. तसेच मारामारीच्या घटनांतही वाढ झाली आहे. निवडणुकीच्या काळातही गुंडगिरी वाढली होती. काहींही गाड्याही फोडल्या होत्या. त्यामुळे अजित पवार यांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर बोट ठेवून पोलिसांना जबाबदार धरले होते. मात्र, याचा पोलिसांनी बोध घेतलेला नाही, असेच या घटनेवरून दिसून येत आहे.
 
व्हिडिओ पाहा...
 

First Published: Saturday, March 10, 2012, 22:40


comments powered by Disqus