लग्नाची भेट 'भारी', बैलजोडी नांदे 'घरी' - Marathi News 24taas.com

लग्नाची भेट 'भारी', बैलजोडी नांदे 'घरी'

www.24taas.com, पुणे
 
लग्न म्हटलं की, भेटवस्तू ह्या आल्याचं मात्र  वधूपित्यानं आपल्या मुलीला दिली आहे अगदी अनोखी भेटी. वाढत्या नागरिकरणात शेतीची परंपरा टिकून राहण्यासाठी वधूपित्यानं अनोखी भेट दिली आहे.
 
वाढतं नागरिकीकरण आणि काबाडकष्ट करुन देखील अल्प मोबदला मिळत असल्यामुळे शेतीकडे वळणाऱ्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. मात्र नव्या पिढीचा शेतीबाबतचा हा उदासीन दृष्टीकोन बदलण्याचं काम एका वधूपित्यानं केलं आहे. पुण्याजवळच्या लोहगावातल्या रोहिदास पवार यांनी मुलीच्या लग्नात इतर काही भेटवस्तू देण्याऐवजी चक्क बैलजोडी, बैलगाडी आणि शेतीची अवजारं भेट म्हणून दिली आहेत.
 
शेतीची परंपरा मुलीबरोबर पुढच्या कुटुंबाबरोबर जावी आणि ही परंपरा टिकावी हा पवार याचा ही भेट देण्यामागचा उद्देश. मुलीच्या आग्रहास्तव शेतकरी पित्यानं दिलेली ही भेट जावयालाही खूपच आवडली आहे. या अनोख्या भेटीची चर्चा सर्व पंचक्रोशीत होते आहे. पुढच्या पिढीत शेतीची मुळं रुजावीत यासाठी रोहिदास पवारांच्या प्रयत्नांचे पंचक्रोशीत सर्वत्र कौतुक केलं जातं आहे. मात्र, शेती सोडून इतर व्यवसायाकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा एक आदर्शच घालून दिला आहे.
 
 
 

First Published: Sunday, March 11, 2012, 18:27


comments powered by Disqus