पुण्यात इव्हीएम मशीन चोरीचा प्रयत्न - Marathi News 24taas.com

पुण्यात इव्हीएम मशीन चोरीचा प्रयत्न

www.24taas.com, पुणे
 
पुण्यातल्या मनपाच्या घोले रोड कार्यालयातून मतदान यंत्र चोरण्याचा प्रयत्न झाला आहे. अज्ञात चोरट्यांनी ऑफीस फोडून ईव्हिएम मशीन पळवण्याचा प्रयत्न केला, शिवाय या मशिनच्या पेट्या फोडून त्यात छेडछाड करण्याचा प्रय़त्न केला होता. या प्रकरणी शिवाजीरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पुणे महापालिका निवडणुकीत इव्हिएम मशीनसोबत छेडछाड करुन निकाल फिक्स करण्यात आल्याचा आरोप काही पराभूत उमेदवारांनी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर इव्हिएम मशीन चोरण्याचा प्रयत्न झाल्यानं संशयाला जागा निर्माण झाली आहे.
 
पण अजून कोणावरही कारवाई मात्र करण्यात आलेली नाही, किंवा कोणालाही अटक मात्र केली गेली नाही, त्यामुळे पुण्यात ईव्हिएम मशीन चोरण्यापर्यंत चोरांची मजल गेल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
 
 
 

First Published: Tuesday, March 13, 2012, 21:39


comments powered by Disqus