Last Updated: Wednesday, March 14, 2012, 08:50
www.24taas.com, सांगली वाळूमाफियांच्या वाढत्या हल्ल्याची गंभीर दखल घेऊन त्यांच्याविरोधात कठोर कारवाया सुरु केल्याची माहिती गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी दिली आहे. गुन्हेगारी स्वरुपाचे लोक आणि वाळूचोरांना वाळूचे ठेके देण्यात येऊ नये याबाबत गृहविभाग महसूल विभागाला सूचना करणार असल्याचे त्यांनी सांगितलंय. सांगलीत आयोजित एका कार्यक्रमात ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
दुसरीकडे येत्या पाच वर्षात ६६ हजार नवीन पोलिसांची पदे भरण्यात येणार असल्याचे आर.आर.पाटील यांनी सांगितलंय. शिवाय यवतमाळ, नांदेड, जळगाव, रायगड आणि या चार ठिकाणी पोलीस प्रशिक्षण केंद्र सुरु करणार असल्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
राज्यात वाळू माफियांची दहशत आजही कायम आहे. खुद्द गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या तासगाव तालुक्यातही वाळू माफियांची दहशत दिसून आली आहे. त्यामुळे राज्यात कायद्याचे राज्य आहे की माफियांचे, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
First Published: Wednesday, March 14, 2012, 08:50