Last Updated: Thursday, March 15, 2012, 16:23
www.24taas.com, पुणे पुण्यात पुन्हा एकदा स्वाईन फ्लूनं डोकं वर काढल आहे. त्यामुळे आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. या स्वाईन फ्लूने एका महिलाचा बळी घेतला आहे.
पुण्यातल्या एका खाजगी रुग्णालयात बारामतीच्या कांता सरोदे या ४८ वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. पुण्यात पुन्हा स्वाईन फ्लूचा रुग्ण आढळल्यानं एकच खळबळ उडालीए. पण पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं ही शक्यता फेटाळून लावलीय. मुळात या महिलेला स्वादू पिंडाचा कॅन्सर असल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचं आरोग्य विभागानं स्पष्ट केलं आहे.
या पार्श्वभूमीवर पुण्यात विविध रुग्णालयात १४ रुग्णांन स्वाईन फ्लूची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय.त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. मात्र ते लवकरच बरे होतील असा विश्वास आरोग्य विभागानं व्यक्त केलाय. २००९ मध्ये स्वाईन फ्लूनं पुण्यात थैमान घातलं होतं. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरलीए. मात्र, नागरिकांनी घाबरुन जाऊ नये असं आवाहनही आरोग्य विभागानं केल आहे.
First Published: Thursday, March 15, 2012, 16:23